spot_img
spot_img

ब्रेकिंग! तब्बल 4 लाख 35 हजाराचा गांजा पकडला! -जिल्ह्यात गांजा तस्करीचे पाळेमुळे खणण्याची गरज!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/ करण झनके) रेल्वेतून गांजा तस्करी करताना एकाला नांदूरा रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 4 लाख 35 हजार रुपयांचा गांजा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात गांजा तस्करी वाढल्याचे चित्र असून पोलिसांनी गांजा तस्करीचे पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ मंडळ,मुख्यालय वहेडकॉटर मुंबई द्वारे दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करीत डीएससीआर,बीएसल यांना गुप्त माहिती मिळाली की,रेल्वे नंबर 12 843 मधील बी 5 कोच मध्ये एक संशयित व्यक्ती बॅग घेऊनप्रवास करीत आहे.या गंभीर सूचनाचे पालन करीत सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रेल्वे नांदुरा स्टेशन येथे आगमन करण्यापूर्वीच एक रेल्वे पोलीस पथक स्थानकावर पोहोचले.निरीक्षक मलकापूर जसबीर राणा,सहाय्यक उपनिरीक्षक बीएस तांगर,प्रधान आरक्षक,सदानंद शर्मा, आरक्षक प्रदीप इंगळे, सीबीआय- बीएसएल टीम यांचा पथकामध्ये समावेश होता.दरम्यान ट्रेन नंबर 12843 चा के बी 5 मध्ये संशयित आढळून आला.त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या 5 बॅगेमध्ये 43.536 केजी गांजाचे 23 पॉकेट आढळून आले.या गांजाची किंमत 435360 रुपये सांगितली जात आहे. बली मंडल एस/ओ विश्वेश्वर महतो वय 30 रा. गडाई नोबारर जयगीर मालदा पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे.आरोपी नांदुरापर्यंत प्रवास करत होता.आरोपीला पुढील कारवाई साठी शेगाव जीआरपी पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!