बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना घेराव घातला.
मागील काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. घरात पावसाचे पाणी घुसून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी यासाठी आज 4 सप्टेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मोताळा तहसीलदार यांना घेराव घालून निवेदन दिले आहे.
निवेदन देतेवेळी उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, रामदास सपकाळ अपंग सेल जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, की से ता प्र सुधाकर सुरडकर, अपंग सेल ता प्र भागवत शिकारे, तालुका संघटक राजु बोरसे, अनंता शिप्पलकर, मुकुंदा शिरसागर, किरण हुंबड, संजय रोढे, विष्णू पाटील, निलेश पाटील, राजु सुरडकर , गजानन कुकडे, गुलाबराव व्यवहारे, भास्कर शिंदे, प्रवीण राजपूत, चंद्रसिंग साबळे, दगडू पाटील, दिलीप शेळके, संतोष निंबाळकर, दत्ता सपकाळ, आकाश दांडगे, निर्मलकुमार इंगळे, अनंता पाटील, राजू झुंजारके, अमोल नखोद, साहेबराव पाटील, शांताराम पाटील यांच्यासह शेतकरी बांधव, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.