चांडोळ (हॅलो बुलढाणा/सलमान नसीम अत्तार)काल झालेल्या मुसळधार पावसाने चांडोळ येथील नदीला आलेल्या पुराने तलाठी कार्यालयात 3 फूट पाणी साचल्याने काही दस्तावेजाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे पूलही वाहून गेलाय.
पावसाने सत्र थैमान घातले आहे.जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. पाऊस सतत सुरू असल्याने येथील तलाठी कार्यालयात तीन फूट पाणी साचले आहे. चांडोळ येथील पुलाचे काम सुरु आहे. वापरण्यासाठी बनवलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. चांडोळ गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव व मुख्य रास्ता हाच आहे.त्यामुळे शाळाकरी व शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.आज असलेल्या मर्दडी देवीच्या यात्रे निमित्त चांडोळ येथील व्यापाऱ्यांना गावातून जाण्यासाठी रुईडखे मयंबा या मार्गे जावे लागले.
इरला, भारज, पासोडी, जाफ्राबाद, खासगाव, जालना, जाण्यासाठी याच मार्गावरून जावे लागत आहे.