बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्ह्यात घातक शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या कमी नाही. सन उत्सवाच्या काळात पोलिस अशा घातक शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतात.आज दोन सप्टेंबर रोजी देऊळघाट येथे एका गुन्हेगाराला एक देशी पिस्टलसह पाच जिवंत काडतूस जवळ ठेवणाऱ्याला अटक करण्यात आली. शेख वसीम शेख रऊफ वय 30 वर्षे, रा. देऊळघाट ता. जि. बुलढाणा ह.मु. कटकट गेट डिपीजवळ, छत्रपती संभाजीनगर
असे आरोपीचे नाव आहे.त्याच्याकडून देशी पिस्टल व 5 काडतुसे असा एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाईस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्ह्यामध्ये शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले पोलीस स्टेशन त्याच बरोबर जिल्हा व तालुका मुख्यालय या व इतर ठिकाणी देशी बनावटीचे अग्नीशस्त्र ( पिस्टल), काडतुसे व इतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री करणारे तसेच असे घातक शस्त्र जवळ बाळगणाऱ्या इसमांचा मुद्देमालासह शोध घेवून, त्याचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी. बी. महामुनी स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले आहे. वरिष्ठ पोनि.श्री.माधवराव गरुड, पोनि.
श्री.अशोक एन. लांडे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची विवीध पथके तयार करुन, त्यांना अवैध देशी बनावटीची पिस्टले, काडतूस बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचित केले होते.
त्यानुसार 2 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की, बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ एक तरुण मुलगा येणार असून त्याचे जवळ देशी पिस्टल व जिवंत काडतूसे आहेत. स्था.गु.शा. चे पथकाने बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एक छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, आरोपी यास पकडले. पोलीसांनी पकडलेल्या आरोपीची पंचां समक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे जवळदेशी बनावटीचे 01 नग अग्नीशस्त्र ( पिस्टल) मॅग्झीनसह किं 40,000 रुपये,जिवंत काडतूस एकूण 05 नग किं. प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे एकूण- 05,000 रुपये, असा एकूण- 45,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण येथे कलम 3/25 भारतीय अग्नी शस्त्र कायद्याप्रमाणे
गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
▪️गुन्ह्यातील ईतर आरोपीतांचा शोध व तपास नमुद प्रकरणात देशी पिस्टल आणि काडतूसे खरेदी-विक्रीशी संबंधीत इसमांचा शोध घेण्यात येत असून, त्या करीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा. चे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. सदर प्रकरणी, पो.स्टे.बुलढाणा ग्रामीण येथे शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असून, पुढील तपास पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण यांचे कडून
करण्यात येणार आहे.
▪️वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व कामगिरी पथक
सदरची कामगिरी मा. श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ खामगांव, श्री बी.बी
महामुनी – अपोअ- बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, वपोनि. श्री. माधवराव गरुड, पोनि श्री. अशोक एन. लांडे प्रभारी
अधिकारी, सपोनि. रुपेश शक्करगे, सफौ. गजानन माळी, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, पोहेकॉ जगदेव टेकाळे, पोना. गणेश पाटील,पोना. संजय भुजबळ सर्व नेमणूक- स्था. गु. शा. बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.










