spot_img
spot_img

‘बुलढाण्यात बोकाळला जुगार! फेसबुक वरून अवैध धंद्यावर प्रहार!’ -नवे एसपी शहरातील वरली मटका बंद करणार काय?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यालय असलेल्या बुलढाण्यात वरली मटक्याचा अवैध धंदा बोकाळाला असून,आतापर्यंत अनेक मान्यवरांनी एसपी,जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. परंतू हे धंदे बंद झाल्या नसल्याचा विषय संशोधनात्मक असल्याची पोस्ट फेसबुक वरून व्हायरल झाली आहे. पोस्टवरील काही गंभीर तर काही मजेदार कॉमेंट्स वाचायला मिळत असल्या तरी कळीचा मुद्दा हा आहे की, जिल्ह्याला नवे एसपी पानसरे लाभले असून,ते शहरातील अवैध धंदे बंद करणार आहेत का? अशी विचारणा केली जात आहे.

सेवानिवृत्त झालेले एसपी सुनील कडासने यांच्या कार्यकाळापासून शहरामध्ये विविध भागात प्रामुख्याने नगरपरिषद शाळा, शासकीय ऑफिस जवळ वरली मटका,चक्री,जुगाराचे अवैध धंदे सुरूच आहेत.हे धंदे बंद करण्याची अनेक मान्यवरांनी मागणी केली.परंतु धंदे बंद झाले नाहीत.एस पी कडासने आता सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी नवे एसपी विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस दलाची धुरा हाती घेतली आहे.हे अवैध धंदे बंद का झाले नाही हा संशोधनाचा विषय असल्याची पोस्ट आशिष खरात यांच्या फेसबुक वरून व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये शहरातील वरली मटका बंद व्हावा यासाठी शेवटचे आंदोलन आम्ही करणार आहोत..आपल्या प्रतिक्रिया जनहितार्थ सुचवाव्या..असेही पोस्टमध्ये म्हटल्याने सदर पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.यातल्या अनेक पोस्ट गंभीर असून,लोकप्रतिनिधीसह पोलीस यंत्रणेची खिल्ली उडविली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!