spot_img
spot_img

विद्यामंदिरात पत्ते कुटले.. अश्लील कं×× आढळले.. शालेय मालमत्तेची नासधूस केली!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) विद्या मंदिराला काही टवाळखोरांनी चक्क पत्ते कुटण्याचा अड्डा बनविला.एवढ्यावरच थांबले नाहीत शालेय साहित्यांची नासधूस केली..गुटख्याच्या पिचकारी मारल्या.यावर कळस म्हणजे आवारात तत्पूर्वी कं××निरोधक आढळून आल्याचा घाणेरडा प्रकार देऊळगाव मही येथील जि.प.क्रें. प्राथमिक शाळेत आज निदर्शनास आला.याबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, 2 सप्टेंबरला सकाळी शाळेत आलो असता,शालेय आवारातील मुलांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेल्या नळाच्या तोट्या तुटलेल्या आढळल्या. व्हरंड्यात काही अज्ञातांनी पत्ते खेळले असून तेथील फरशी उखडलेली व शाळेत तंबाखूमुक्त अभियान सुरू असताना, गुटख्याच्या
पिचकार्‍यांनी व्हरंडा घाण केलेला दिसून आला.एक सतरंजी देखील तेथेच पडून आहे.शाळेच्या आवारात संडास- मुत्रीघराचे युनीट बांधकाम सुरू आहे.त्याची देखील नासधूस करण्यात आली.यापूर्वी संडास मुत्रीघरा जवळ कं×× निरोधक आढळून आलेत.दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त घालावी व सदर अज्ञात गुन्हेगाराला अटक करून पुढील त्रासापासून शाळेचा बचाव करावा, असे शाळा समितीचे अध्यक्ष भगवान जोशी व मुख्याध्यापक राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!