spot_img
spot_img

ब्रेकिंग! अवघे घर आगीच्या भक्षस्थानी! -एक लाखाच्या रोकडसह तीन लाख ६० हजाराचे नुकसान!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव) देऊळगाव राजा शहरातील अहिंसा मार्गावरील एका घरात मध्यरात्री आग लागून संसार उपयोगी घराचा कोळसा झाला.या घटनेच्या पंचनाम्यात तब्बल ३६०००० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.

देऊळगाव राजा शहरातील अहिंसा मार्गावर कांतीलाल माणिकराव सुपारकर यांचे घर आहे. रात्री १२ च्या दरम्यान घराला अचानक आग लागली. गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आगीच्या भल्या मोठ्या ज्वालांनी रौद्र रूप धारण केले.या आगीत १००००० रोख रुपये भस्मासात झाले. तर भेलपुरी चा गाडा,४० ते ४५ टिनपत्रे व संसार उपयोगी साहित्य जळाले आहे. विविध धान्याचे कट्टे सुद्धा जळाले असून एकूण नुकसान ३६०००० रुपयांचे नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!