बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्या ची घटना दुर्दैवी आणि जगातील शिवप्रेमींच्या मनाला चटका देणारी आहे.जसे सर्वांना या घटनेचे दुःख झाले तसे भाजपाला सुद्धा झाले.सरकार चौकशी समिती नेमून सत्य समोरआणणार आहे.परंतु महाविकास आघाडी सदर घटनेचे फोटो व्हायरल करून एक प्रकारे शिवरायांची अवहेलना करीत असून महा विकास आघाडीचा आम्ही धिक्कार करीत आहोत.त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या नावावर सूडबुद्धीने राजकारण करू नये!अशा शब्दात माजी आमदार तथा भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयराज शिंदे यांनी आज निदर्शन आंदोलनात निषेध नोंदविला.
शहरातील संगम चौकात भारतीय जनता पक्षातर्फे महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती.या घटनेच्या पार्श्वभूमीवर विजयराज शिंदे म्हणाले की,सदर घटना जगातील शिवप्रेमींच्या मनाला चटका देणारी आहे.ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.ही घटना घडविली नसून ती घडलेली आहे.सरकारने चौकशी समिती नेमून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी!’करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे.भाजप पक्षाला देखील याचे अत्यंत दुःख आहे.परंतु महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे.ते निंदनीय आहे.महाविकास आघाडी कडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे फोटो व्हायरल करून छत्रपतींची अवहेलना केली जात आहे.या घटनेचा भाजपा निषेध करीत आहे.असे यावेळी विजयराज शिंदे यांनी म्हटले.राजकारण करायचेच असेल तर पुतळ्यांच्या माध्यमातून करू नये.थेट मैदानात येऊन उघड राजकारण करावं..असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.यावेळी संगम चौकात शिवरायांच्या स्मारकाजवळ जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या.शिवाय निषेध फलक हातात घेऊन महाविकास आघाडीचा निषेध नोंदविण्यात आला आहे.