देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) युवा कार्यकर्ते सचिन जगन नागरे यांना नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद वतीने यंदाचा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, सन्मानपत्र, मेडल, तांब्रपट व महात्मा कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी पुरस्कार निवड मानपत्राव्दारे नुकतेच त्यांना कळवले आहे. येत्या संप्टेंबर महिन्यात हा पुरस्कार त्यांना वितरित केल्या जाणार आहे.सचिन नागरे हे मुक्त पत्रकार, कृषी पदवीधर असून लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते सुध्दा आहेत. अंबाजोगाई येथील मानवलोक सामाजिक संस्था, घाटंजी येथील विकासगंगा समाजसेवी संस्था व आनंदवनचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांची महारोगी सेवा समितीच्या समाजभान प्रकल्पातही त्यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर पुणे येथे दैनिक लोकमत मध्ये सुध्दा ते काही काळ एसएमटी म्हणून कार्यरत होते.
- Hellobuldana