सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील एका जि.प.शाळेत अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक खुशालराव उगलेला अटक झाल्यानंतर, याप्रकरणी 26 ऑगस्ट रोजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक आसाराम नामदेव मांजरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल झाला असताना वरिष्ठांना तातडीने कळविणे आवश्यक
होते. मात्र, मुख्याध्यापकांनी तसे केले नाही. सोबतच विनयभंग प्रकरणातील आरोपी खुशालराव उगले हा दरवाजा बंद करून अध्यापन करीत असल्याचे पूर्वीच निदर्शनास येऊनही त्याबाबत आवश्यक ती कारवाई केली नाही. अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरणात तातडीने उचित कारवाई केली नाही, हा कर्तव्यातील कसूर आहे. पर्यायाने आसाराम नामदेव मांजरे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ चे नियम ३ चार भंग केला असल्याचे सिद्ध झाले आहे.तसेच निलंबन कालावधीत मुख्यालयाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरुन स्वतंत्र आदेश काढण्यात
येतील असेही निलंबन पत्रात म्हटले आहे.










