बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चुलतभावाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून नात्याला काळे फासल्याची घटना धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकागावात उघडकीस आली.या प्रकरणी आरोपी भावाला ताब्यात घेण्यात आले.आरोपीने पीडीतेला फुस लावून पळविल्याची सर्वप्रथम बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने प्रकाशित केली होती,हे विशेष!
पीडित मुलगी अल्पवयीन आहे व 23 वर्षीय आरोपी हे नात्याने चुलत चुलत बहीण भाऊ आहेत.आरोपीने अल्पवयीन बहिणीला दुचाकी वरून फुस लावून पळवून नेले होते.पीडीतेच्या वडिलांनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले होते.त्यानंतर दोघांनाही सखी वन स्टॉप सेंटर येथे आणण्यात आले होते. दरम्यान बलात्कार झाल्याची उघड झाल्याने पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 37(2),62,64(2) (एफ) (एम), 65(1) सहकलम 4,6 पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल केला.
▪️कायद्याची भीती राहिली नाही का?
महिला, मुलींवर अत्याचार, बलात्कार, हत्या या घटना मनाला अतिशय वेदना देणाऱ्या आहेत. मुलीला जगायचं असतं, तिचे काहीतरी स्वप्न असतात आणि कोणीतरी एक नराधम तिचे स्वप्न पूर्णपणे विस्कटून टाकतो. हे अत्यंत भयानक आहे.बदलापूरमध्ये एका शाळेत 2अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताहेत.अको ला,सिंदखेडराजात ही अत्याचाराची घटना घडली असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळे ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत, असं संतप्त नागरीकांचे म्हणणे आहे.










