बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धामणगाव बढे पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना समोर आली. महिला अत्याचारा विरुद्ध राज्यात संतापाची लाट उसळली असताना, बुलढाणा जिल्ह्यातही अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. ही अत्याचाराची आकडेवारी ‘ती’ असुरक्षित असल्याचेच सांगतेय!
सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी शाळेत एका शिक्षकाने 4 चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घटना नुकतीच घडली.आता धामणगाव बढे पोलीस ठाणे अंतर्गत एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना पुढे आली आहे. बादल वय 21 राहणार तालुका मोताळा असे आरोपीचे नाव आहे.फिर्यादीच्या चुलत भावाचा मुलगा हाच आरोपी निघाला असून आरोपी बादल याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला घरातून मोटरसायकलवर फुस लावून पळवून नेले आहे. या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 137 (2 )भान्यासं नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान अवघ्या चार तासाच्या आत आरोपीला व पिडितेला शेगाव येथून अटक केली आहे. पिडिताला बालकल्याण समिती येथे हजर करून सखी वन्स ऑफ सेंटर येथे संगोपनासाठी पाठविल्याची माहिती मिळत आहे.जिल्ह्यात
मुली सुरक्षित नाहीत त्यामुळे
अत्याचाराच्या घटनेनं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यभर बदलापूर घटनेचा निषेध होत असून या घटनेमुळे संतापलेले लोक रस्तावर उतरलेत. इथले भय संपत नसून ‘लाडकी बहीण योजना’ नव्हे तर ‘सुरक्षित लाडकी बहीण योजना’ हवी असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.आजपर्यंतचा इतिहास तपासला तर, पीडितेला न्याय मिळेलच याची काही शाश्वती दिसून येत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.