बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बदलापूर अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. बुलढाण्यातही या घटनेचा निषेध केला जात आहे. आज भर पावसात काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा विधीज्ञ जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निषेध आंदोलन केले.यावेळी भरपावसात अनेक महिलांच्या डोळ्यातून अश्रु तराळले होते.
बुलढाणा जिल्हा कचेरी समोर हे मूक आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद बुलढाण्यात उमटत असून आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन केले. काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेकडो महिला सामील झाल्या होत्या.