चिखली (हॅलो बुलडाणा) प्रश्न 1) नारिशक्तीचा सन्मान “अत्याचार” झाल्यावरच का आठवतो ? आपली पत्नी,आई,मुलगी,काम करणारी ताई,किंवा आपली अधिनस्थ किंवा सहकारी स्त्री यांना आपण स्त्री म्हणून उचित सन्मान देतो का?
प्रश्न 2) दहीहंडीच्या कार्यक्रमाला “हिरोईन” आणल्याशिवाय दहीहंडीतील दही/लोणी बाहेर येत नाही का?
प्रसंग पहिला : शेतातील तन संपता संपेना,भाववाढ होईल म्हणून दोन वर्षांपासून न विकलेल्या सोयाबीनला आता कुत्र विचारेना,भक्तिमार्गात जमीन सरकारने काढून घेतली तर पोरगा करेल तरी काय? हाताला काम नाही!,पिकाला भाव नाही!,महागाई आ वासून पाहतेय !!
प्रसंग दुसरा : राज्यभरात ‘मराठा आरक्षण ‘ निमित्ताने समर्थक,विरोधक,सत्ताधारी आणी जनता यांच्या मध्ये अंदाधुंदीची परिस्थिती असताना, कोलकत्ता,बदलापूर आणी अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत असताना,विरोधी पक्ष या स्त्री अत्याचार प्रकरणावर भावनिक राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्यास तयार असताना, मुंबईतील नेत्याने आदेश दिला की आपला पोरगा सरकारी बस फोडायला तयारच असताना…. इतरही अनेक इतर ज्वलन्त विषय असताना देखील…….
फक्त आपल्या काळजीपोटी… आपल्या तरुण शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या “लग्न होत नसलेल्या मुलांसाठी,बेरोजगार बसलेल्या प्रचंड तरुणाईसाठी “दहीहंडीच्या निमित्ताने” आपल्या मनातील भावनांचा न आवरता येणारा आवेग बघून आमदार व माजी आमदार दोघांनीही आपल्यासाठी खास “मुंबईच्या सौंदर्यवती ललना बोलावल्या आहेत,आपला मूळ स्वभाव माहिती असल्याने जाणून आपल्याला नेमकं काय पाहिजे हे आपले नेते ओळखून असल्यामुळेच याबाबतीत दोन्ही गटांच “एकमत” झालेलं दिसून येत असल्याने ही तालुक्याच्या राजकारणात चांगली लक्षणे मानता येतील.आता आर्ची येणार म्हटल्यावर प्रत्येक घरातील ‘बेरोजगार परश्या’ तिच्या तालावर नाचायलाच पाहिजेच…
त्यामुळे पिक वा पाऊस,बेरोजगारी, मुलीवर,स्त्रियावर होणारे नेहमीचे अत्याचार अशा कोणत्याही फालतू गोष्टीच टेन्शन न घेता,आणी या बातमीच्या शीर्षक असलेल्या दोन्ही प्रश्नांना बगल मारून, दोन्ही कार्यक्रमाला एक्सट्रा पॅन्ट घेऊन हजर राहावे,हिच विनंती…….
शक्य झाले तर नारिशक्तीच्या विशेष सन्मानासाठी “स्त्रियासाठी विशेष दहीहंडी” आयोजित करून त्याला प्रमुख पाहुने म्हणून ‘सलमान खान’ व ‘इम्रान हाश्मी’ यांना बोलवता येईल का ? अशी विनंतीही आयोजकांना करण्यात येणार आहे.