मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) बदलापूर येथील आदर्श विद्यालयातील कर्मचारी याने ३ व ४ वर्षाच्या चिमुकली वर केलेल्या अत्याचारा विरुद्ध त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलकापूर तर्फे मलकापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
बदलापूर मुंबई येथील आदर्श विद्यालय मध्ये काम करण्याऱ्या अक्षय शिंदे नावाचा नराधमाने 4 वर्षाच्या मुलींवर लैंगिक शोषण करून अत्याचार केले सदर व्यक्तीचा इतिहास पाहता या आधीही सादर व्यक्तीने अश्या प्रकारचे लैगिक छळ करण्याचे गुन्हे केलेले असल्याचे समजते असे असतानाही त्याला संस्थेवर का ठेवले हाही एक प्रश्न उभा राहतो आहे सदर संस्था इतकी जुनी आणि कधीकाळी राम पाधरकर सारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याचे अध्यक्ष पद भूषवलेले संस्थेच्या असूनही संस्थेत साधे सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत नाही किती दुर्दैवी गोष्ट आहे तरी आदर्श विद्यालय मुंबई या शाळेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या कर्मचारी अक्षय शिंदेला फाशी शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष दीपक राठोड , शहर अध्यक्ष गणेश ठाकूर , तालुका उपाध्यक्ष निखिल चिम , दिपक राऊत शहर उपाध्यक्ष , किशोर रोडे मनविसे ता अध्यक्षासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.