बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचार प्रकरणी महाराष्ट्रात हिंदू राष्ट्र संघटना पेटून उठली आहे.
मंगळवारी बुलढाणा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .बांगलादेशात हिंदू वर होणारे अत्याचार,मंदिरांची नासधूस,महंत राम गिरीयांच्या वक्तव्यानंतर देशभरात पडसाद उमटले.दरम्यान काही राजकीय नेत्यांनी देखील निंदनीय वक्तव्य केले.त्यामुळे निषेध म्हणून हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने मंगळवारी बुलढाणा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल,महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी संघटना या बंदमध्ये सहभागी आहेत.