मलकापूर(हॅलो बुलढाणा/करण झनके) गरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा मिळावी, या आशेने आलेल्या रुग्णांना X-RAY टेक्निशियन उपलब्ध नसल्याने बाहेरून X-RAY काढावा लागतो. चांगली सुविधा मिळावी म्हणून रुग्णही प्रतिप्रश्न न करता निमूटपणे आर्थिक नुकसान सहन करतात, असे मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या निदर्शनास आले व त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश उंबरकार यांना याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.
महागड्या वैद्यकीय सेवांमुळे मोफत चांगली सुविधा मिळणार या आशेने शासकीय उपजिल्हा रुग्णालयांकडे नागरिकांनचा कल वाढत आहे. परिणामी चाचण्या करण्यासाठी उपलब्ध मशीनरी उपजिल्हा रुग्णालयात आहेत परंतु त्या चालवण्यासाठी आवशयक टेक्निशियन नसल्याने रुग्णांना बाहेरून चाचण्या कराव्या लागतात व त्याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना पडत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवाना दिव्यांग सर्टिफिकेट मिळावे या करिता दिव्यांग बोर्ड मलकापूर येथे सुरू करण्यात आला आहे,त्यासाठी आवशयक असलेला X-RAY काढण्यासाठी मात्र त्यांना बाहेर जावे लागते व बाहेर त्यासाठी 1800 ते 2000 हजार रुपये खर्च येतो हा खर्च गरीबांसाठी न परवडणारा असून गेल्या सहा महिन्या पासून मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात X-RAY टेक्निशियन नसल्याने X-RAY मशीन सुद्धा धूळ खात पडलेली आहे तरी लवकरात लवकर X-RAY टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांचे सह मनवीसे शहर अध्यक्ष निखिल पोंदे,गजराज साळुंखे, रितेश भोपडे यांनी एका निवेदनाद्वारे केली असून येत्या आठ दिवसात X-RAY टेक्निशियन उपलब्ध न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.