बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील हिरोळे पेट्रोल पंपा समोरील महाराष्ट्र अर्बन बँकेचे बांधकाम सुरू आहे. येथील बांधकामाचे १८,५०० रुपये किमतीचे सेंट्रींगचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.जयस्तंभ चौक शहराचे हृदय स्थान आहे अगदी जवळ एसपी ऑफिस आहे. तरीही भुरटे चोर पोलिसांना भारी पडत आहे.
चिखली येथील अमोल जगन्नाथ ठोसरे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांचे हिरोळे पेट्रोल पंपा समोरील महाराष्ट्र अर्बन बँकेचे काम सुरू आहे.हिरोडे पेट्रोल पंपावरील वॉचमन संजय गायकवाड रा. कोलवड यांचा रात्री एक वाजता च्या दरम्यान ठेकेदार ठोसरे यांना सदर बांधकामावरील साहित्याची चोरी झाल्याचे मोबाईल वरून कळविले.या ठिकाणी दुसऱ्या दिवशी येऊन पाहिले असता एकूण १८५०० रुपयांचे सेंट्रींगचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.










