spot_img
spot_img

पतीची अशीही उचापती! -फेसबुकवर पत्नीचे बदनामीकारक स्टेटस ठेवले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पतीने फेसबुक अकाउंटवर पत्नीचेच बदनामीकारक स्टेटस ठेवल्याची तक्रार बुलढाणा सायबर विभागाकडे दाखल करण्यात आली आहे.

दिनेश रमेश मुंडेरे रा.चिचपुर ता.खामगाव असे आरोपीचे नाव आहे.त्याच्या विरोधात पत्नीने सायबर सेल कडे तक्रार केली आहे.तक्रारीत म्हटले आहे की,सन 2009 मध्ये दिनेश रमेश मुंडेरे याच्याशी रीतीने वाजाप्रमाणे लग्न झाले.आम्हाला दोन मुली दोन मुले आहेत.सर्व मुले पतीकडे राहतात.पती दिनेश नेहमी पैशांची मागणी करीत असतात. चारित्र्यावर संशय घेत असतात. वादही उकरून काढतात.त्यामुळे चार महिन्यापासूनमी वडीलाकडे राहत असल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.1ऑगस्ट रोजी दिनेशने त्याच्या मोबाईलच्या फेसबुक अकाउंट वर पत्नीचा फोटो व बदनामीकारक स्टेटस ठेवल्याने पतिरुद्ध पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!