spot_img
spot_img

आमदार राजेश एकडे काय म्हणालेत?

मलकापूर (हॅलो बुलढाणा / करन झनके) शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला प्रशासनाचा नाहक त्रास होता कामा नये या दृष्टीनेच प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजे असे स्पष्ट मत आमदार राजेश एकडे यांनी समन्वय सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना व्यक्त केले. मलकापूर-नांदुरा तालुका समन्वय सभा आज ८ ऑगस्ट रोजी स्थानिक नगर परिषदेच्या सभागृहात आमदार राजेश एकडे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, पोलीस निरीक्षक गणेश गिरी आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्य लोकांची प्रलंबित कामे, वीज वितरण कंपनीकडील शेतकरी बांधवांची समस्या, अडचणींबाबत आमदार राजेश एकडे यांना अवगत करण्यात आले असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने समोर बोलावून संबंधित सर्वसामान्य व शेतकरी वर्गाला सहकार्य करा, त्यांची अडलेले कामे तात्काळ पूर्ण करा, किंबहुना त्यांना प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असले पाहिजे ही भूमिका त्यांनी बोलून दाखवली. त्याचप्रमाणे समोर आलेल्या अडीअडचणी समस्या अपेक्षा या बाबींचे तातडीने निवारण करा असे आदेश सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान घरकुल योजना, न.प. अंतर्गत करण्यात आलेली विकास कामे, पंचायत समिती अंतर्गत सर्वसामान्यांची रखडलेली कामे, कृषी विभागातर्गत पी एम किसान योजनेचे प्रखडलेले अनुदान, एम आर इ जी एस अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कृषी कर्ज अशा विविध विषयांवर लक्ष केंद्रित करीत आमदार राजेश एकडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेत वस्तुस्थिती जाणून घेतली तर उद्भवणाऱ्या अडचणींवर सुद्धा कसा मार्ग काढायचा यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!