8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

मोठी बातमी! राज ठाकरेंचा मनसे पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर लढणार – सूत्र

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढू शकतो.

मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील दीड तासांपासून ही बैठक सुरु आहे.

मुंबईत सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. मनसे आणि महायुतीमध्ये रोज बैठका होत आहे. नुकतंच राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी विनोद तावडे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते. यादरम्यान काय चर्चा झाली याचा खुलासा दोन्ही पक्षांनी केला नव्हता. एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह बैठक सुरु आहे.

दिल्लीतील बैठकीत काय झालं होतं?

“दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली. अमित ठाकरेही सोबत होते. महायुतीत सहभागी होण्यासंबंधी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आणखी एका बैठकीनंतर यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या सकारात्मक चर्चा झाली इतकंच सांगू शकतो,” अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.

“लोकसभा निवडणूक असल्याने त्यासंदर्भातच चर्चा झाली. आम्ही कोणताही फॉर्म्यूला दिलेला नाही, पण नेमक्या किती जागा मिळाव्यात ही भावना सांगितली आहे. भाजपाला सांगण्यता आलं असून एक-दोन दिवसात माहिती आल्यानंतर सविस्तर सांगू,” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं होतं.

मनसेला किती जागा मिळणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या निवडणुकीतून अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा भाजपचा आग्रह आहे. तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील. दरम्यान शिर्डीमधून मनसेचे नेते बाळा नांदगावकर उमेदवार असू शकतील. पण दुसरीकडे भाजपा मनसेला एकच जागा देणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!