बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्यांना आपण सत्तेवर बसविले ते आपल्या विचारांचे नसेल तर सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही.एससी एसटीने ओबीसींना मतदान करावं आणि ओबीसींनी एससी एसटींना मतदान करावं असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.ते बुलढाणा येथे आले असता बोलत होते.
पुढे ते म्हणाले की,
बीपी सिंग यांनी 7 ऑगस्टला ओबीसी आरक्षण जाहीर केले.एक पिढी सत्तेत आली.परंतु आता धर्म धोक्यात नाही, आरक्षण धोक्यात आले.एस सी, ओबीसी आरक्षणाला धोका आहे.आरक्षणाची भीती घालवायची असेल तर छत्रपती संभाजी नगरला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असेही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.ओबीसीची मागणी आहे की जनगणना व्हायला पाहिजे.ओबीसी आणि ओबीसीला मानणारे शंभर आमदार विधानसभेत गेले पाहिजे.राहिलेले 57 आमदार हे एससी एसटीचे आहेत. 57 आमदार वंचित चे निवडून आले पाहिजेत.ते पणओबीसींच्या मतांवर निवडून आले पाहिजेत.आपल्याला मतदान ओबीसी म्हणून करून घ्यायचे आहे.जो पक्ष आपली भूमिका घेत नाही तो आपला पक्ष नाही.57 वंचित चे अर्थात एस सी एस टी चे आणि शंभर ओबीसींचे आमदार असल्यास आगामी काळात सत्ता आपलीच आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत एससी एसटीने ओबीसींना मतदान करावं आणि ओबीसींनी एससी एसटींना मतदान करावं असं आवाहन ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.