बुलढाणा (हॅलो बुलढाणा) परीक्षा कोणतीही असो!ती खरच पारदर्शीपणे राबवली जाते का?अलीकडे तर परीक्षांमध्ये अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यापैकीआरोग्य सेविका पद भरतीत कागद पडताळणी व नियुक्ती बाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत ए एन एम सहाय्यकारी प्रसविका शैक्षणिक पात्रता असणाऱ्या महिला उमेदवारांनी शंका उपस्थित केली आहे.
राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत विविध पद भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आयबीपीएस कंपनीने सीबीटी ऑनलाइन संगणक प्रणाली द्वारेपरीक्षा घेतली असून निकाल जाहीर केले आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया जिल्हा निवडसमितीमार्फत सुरू असून आरोग्य सेविका या पदाकरिता शासन नियम व सध्या होत असलेली कागदपत्रे पडताळणी यामध्ये विरोधाभास व विसंगती दिसून येत आहे.असा आरोप होत आहे.
सदर पदाबाबतची शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या ए एन एम सहाय्यकारी प्रसविकाशैक्षणिक गुणवत्ता प्राप्त महिलांवर अन्याय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सदर आरोग्य सेविका पदाकरिताशासन नियमानुसार ए एन एम पात्रता असताना त्याच ठिकाणी जी एन एम व बीएससी नर्सिंगमहिला उमेदवारांची कागद पडताळणीहोत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत एएनएम पदासाठी जीएन एम व बीएससी नर्सिंग महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होत आहे का?सदर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत का?किंवा दिल्या जाणार आहेत का?त्याचा खुलासा करण्यात यावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.याप्रकरणी जाब विचारण्यासाठी जिल्हा परिषदेवर धडक सुद्धा दिली जाणार असल्याची माहिती आहे.