6.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा काँग्रेस कडून निषेध!

लोणार (हॅलो बुलढाणा) अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीने आंदोलनाद्वारे निषेध करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

संसदीय विरोधी पक्ष नेते तथा कांग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संसदेत जाती नुसार जनगणना करावी अशी मागणी केली. जिसकी जितनी जनसंख्या उतनी उनकी भागीदारी या विषयाला विरोध करीत खा. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबाबत जातीवाचक व बेताल वक्तव्य केल्याबद्दल लोणार तालुका कांग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी व शहर काग्रेंस शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांचा नेतृत्वात आज दिनाक
वतीने २ ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.
सोबतच मोदी सरकार व भाजप सरकार मुर्दाबाद, अनुराग ठाकूर यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी,शहर अध्यक्ष शेख समद, जेष्ट नेते शांतीलालजी गुगलिया , अन्नाभाऊ सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव पटोळे,माजी पंचायत समिति सभापति ज्ञानेश्वर चिभडे,ओ.बी.सी.सेल जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात,उपनगरध्यक्ष बादशाह खान,गट नेते भुषण मापारी, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तौफिक कुरैशी, युवक कांग्रेस जिला अध्यक्ष अनिकेत मापारी आदी काँग्रेसी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!