बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दुचाकी लोटत नेत असणाऱ्या एका युवकाला अश्लील शिवी देत ,गाडी मे पेट्रोल डालने के लिए पैसे नही!म्हणत मारहाणू जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आली आहे.
ऋतिक शिवाजी सावळे राहणार डोंगरशेवली ता. चिखली हा युवक श्री सहकार विद्या मंदिर महाविद्यालय खंडाळा येथे शिक्षण घेतो.दरम्यान 28 जुलै रोजी साडेपाच वाजता ऋतिक दुचाकी मधील पेट्रोल संपल्याने दुचाकी लोटत जात असताना आरोपी शेख वसीम शेख मकबूल याने अश्लील शिवीगाळ करीत गाडी मे पेट्रोल डालने के लिए पैसे नही!म्हणत उगाच वाद घातला. ऋतिकने शिवी का देतो म्हणून विचारले असता, शेख वसीम शेख मकबूल व शेख असलम शेख मकबूल या दोघांनी मिळून ऋतिकला चापटा बुक्यांनी त्यांनी मारहाण केली.जास्त बोलशील तर जिवाने मारून टाकेल अशी धमकी दिली.अनिल सावळे व राजेंद्र सावळे हे घटनास्थळी असल्याने वाद सोडविण्यात आला.दोन्ही आरोपीवर कारवाई व्हावी अशी तक्रार ऋत्विक ने पोलिसांना दिली आहे.














