spot_img
spot_img

बुलढाण्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हातसाफ! -कुठे झाली चोरी?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले 65 हजार रुपयांची सोन्या चांदीचे दाग दागिने चोरून नेल्याची घटना जांभरून येथील गणराज नगरात घडली आहे.

दत्तात्रय लामधाडे रा.गणराज नगर जांभरून जिल्हा बुलढाणा यांनी या चोरी प्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
दत्तात्रय लामधाडे रा.गणराजनगर जांभरून येथे एकटेच राहतात.येथील लद्दड हॉस्पिटल येथे लॅब टेक्निशन म्हणून ड्युटी करतात.ते नाईट ड्युटी साठी गेली असता,अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडूनकपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दाग दागिण्यावर हात साफ केला.सोन्याचा गोफ दोन ग्रॅम,सोन्याची अंगठी चार ग्रॅम,सोन्याचा ओम एक ग्रॅम,गहू मणी तीन ग्रॅमअसे एकूण दहा ग्रॅम सोने ज्याची किंमत 30,000 रुपये आहे.तसेच 5 हजार रुपये किमतीची चांदीचे कडे,नंतर चांदीचे दागिने मिळून 35,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.दरम्यान बुलढाणा परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली असताना पोलीस काय करतात?रात्री खरंच नियमित गस्त होत असते का?असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित व्हायला लागला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!