लोणार (हॅलो बुलढाणा /लखन जाधव) लोणार येथून मेहकरकडे येणाऱ्या भरधाव काळीपिवळीला चिंचोली फाट्याजवळ भीषण अपघात होऊन १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, २८ जुलै रोजी घडल्याची सर्वप्रथम ब्रेकिंग ‘हॅलो बुलढाणा ‘ ने दिली होती.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास लोणार येथून एक काळीपिवळी (क्रमांक एमएच ३७ बी ६२३४) मेहकरकडे भरधाव येत होती. दरम्यान, चिंचोली फाट्याजवळ चालकाचे काळीपिवळीवरील नियंत्रण सुटले. विशेष म्हणजे यावेळी समोरून कोणतेही वाहन नसताना चालकाने काळीपिवळी थेट रस्त्याच्या खाली खड्ड्यात घातली. या अपघातात काळीपिवळी समोरच्या बाजूने कोसळल्यामुळे सर्व प्रवासी एकामेकांवर आदळल्याने एकच आक्रोश झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश राईतकर यांनी दिली.यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने बचावकार्य करत काळीपिवळीतून जखमींना बाहेर काढले. प्रवासी एकमेकांवर पडलेले असल्याने आधी कोणाला काढावे, असा संभ्रम यावेळी नागरिकांना पडला. या दरम्यान प्रवाशांखाली दबलेल्या जखमी चालकालाही नागरिकांनी बाहेर काढले. परंतु, त्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात १४ प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यामध्ये तमन्ना भारत शिंदे (वय ८, रा. मालेगाव) स्वाती भारत शिंदे (वय ३०, रा.मालेगाव), दिपाली तुकाराम गायकवाड (वय २२, रा. मालेगाव), कामक विष्णूकडे (वय ६१, रा. सुलतानपूर), खुशीभारत शिंदे (वय १३, रा. मालेगाव), संगीता प्रसाद शेवाळे (वय ७०, रा. वेणी), दिपाली किसन बाजार (वय २४, रा. लोणार), रईसाबी शेख रईसोद्दीन (वय ५४), आसमा शेख अमीन (वय ६०, रा. लेहणी), निर्मला तुकारामगायकवाड (वय ५२, रा. मालेगाव), रोहीत शिवरकर (वय २३, रा.चिखली), साक्षी रोहीत शिवरकर (वय १९, रा. चिखली) आदींचा समावेश आहे. यापैकी काही जखमींना मेहकरयेथील ग्रामीण रुग्णालयात दाखलकरण्यात आले, तर काहींवर खासगीरुग्णालयात उपचार सुरू आहेत. याघटनेची माहिती मिळताच नीरजरायमुलकर, सागर कडभने, रवी जुनघरे, वरद ठाकूर, सचिन मापारी, तेजसअवस्थी यांनी धाव घेऊन मदतकार्यातसहभाग घेतला.










