spot_img
spot_img

साहेब! या पांदण रस्त्यावरून चालून दाखवा हो! – पांदणरस्त्यात यंत्रणा रुतली!

चांडोळ (हॅलो बुलढाणा/सलमान नसीम अत्तार) धाड परिसरात पांदण रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून, कुठल्याही साहेबांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवावे,असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

धाड परिसरातील अनेक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र, दुरुस्ती व देखभाली अभावी बहुतांश पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे असे हाल होत असल्यावर सुद्धा धाड परिसरातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता लोकप्रतिनिधी सह शासन व प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे या पांदण रस्त्याचा‌ वनवास आता तरी संपणार का ? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करून आहे.
धाड परिसरातील अनेक पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून अकुशल माती काम झाले आहे. काही गावानजीकचे‌ रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत हया पांदण‌ रस्त्यांची पावसाळ्यामध्ये फार दयनीय अवस्था होत असते. ज्या शेतकऱ्यांना शेतात जागा आहे असे शेतकरी पावसापूर्वीच खत,बियाणे शेतात नेऊन ठेवतात परंतु ज्यांच्या कडे जागा नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न ही शेतकऱ्यांना भेडसावतो तसेच पावसाळयाच्या दिवसात शेतमालाची ने – आण करणे , पेरणी करण्याकरिता मजूर नेणे , बैलबंडीने किंवा ट्रॅक्टरने शेती उपयोगी अवजारे व‌ खत किंवा तत्सम साहित्य पोहोचवणे याकरिता पावसाळ्यात पांदण रस्ता चिखलमय असल्याने शेतकऱ्यांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. परिसरातील शेतकरी शासन व प्रशासनाकडे वारंवार पांदण रस्ता दुरुस्तीसाठी प्रस्ताव देत असतात. मात्र याकडे हेतुपुरस्सर सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी बांधवांकडून नेहमीच ऐकावयास मिळते . त्यामुळे ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी पांदण रस्त्याकरिता निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे , धाड परिसरातील सर्व पांदण रस्त्याचे नूतनीकरण करून पुनरूज्जीवन करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

▪️पांदण रस्ते मंजूर , पण काम कधी होणार?

धाड परिसरात मातोश्री पांदण योजने अंतर्गत प्रत्येक गावात पांदण रस्ते मंजुर आहेत. काहीचे काम झाले तर बरेच शेत रस्ते होत नसल्याचे पहायला मिळत आहे. बऱ्याच शेत रस्त्यांना झाडे झुडपांनी अतिक्रमण केले आहे.परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सुर उमटत असून शेत रस्ते होणे गरजेचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!