बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘लोकसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेने उबाठा शिवसेनेची वाटचाल सुरू आहे, असे मत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केले.
निमित्त होते पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे! त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आज २७ जुलै रोजी जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्री संदीप शेळके यांनी गर्दे वाचनालय बुलडाणा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवंत यांच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे रुग्णांना फळ वाटप, अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व स्नेहभोजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी गर्दे वाचनालयात जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या हस्ते श्री संदीप शेळके यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्धघाटन संपन्न झाले.
यावेळी शहर प्रमुख हेमंत खेडेकर, किसान सेनेचे अशोक गव्हाणे, युवानेते अमोल बुधवत, युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे, उप तालुका प्रमुख संजय गवळी, ओमप्रकाश नाटेकर, विजय इतावारे, मा पं स सभापती सुधाकर अघाव, एकनाथ कोरडे साहेब, आशिष बाबा खरात, मोहम्मद सोफियान, सरपंच रामेश्वर बुधवत, उपसरपंच राजु मुळे, रवि गोरे, राहुल जाधव, अनिकेत गवळी, रामू राजपुत, सरपंच भगवान नरोटे, अनिल जाधव, संभाजी शिंदे, संतोष आवटे, वीरेंद्र बोरडे, रवींद्र मिसाळ, सुधाकर मुंढे, गोविंद दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.