बुलढाणा (हॅलो बुलढाणा / राजेंद्र घोराडे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गायत्री शिंगणे यांना “सिल्वर ओक” येथे बोलावून घेतले, सिंदखेड राजा मतदारसंघ व मतदारसंघातील जनता यांच्याशी असलेल्या अनेक वर्षांपासूनच्या नात्यांना मा. पवार साहेबांनी उजाळा दिला, या नात्याची विन अधिक घट्ट करण्यासाठी गायत्री शिंगणे यांनी आता तयारीला लागावे असा संकेत वजा आदेश मा. शरद पवार यांनी दिला असल्याचे गायत्री शिंगणे यांनी म्हटले आहे.
लोकशाहीचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे,यामध्ये “मी उतनार नाही,माजणार नाही,घेतला वसा टाकणार नाही”,असा वसा सदैव स्मरणात ठेवावा लागतो,त्याचप्रमाणे जनतेला सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही हेही स्मरणात ठेवावे लागते,याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे,रावसाहेब दानवे यासारख्या दिग्गजांनाही आला.
वैकुंठवासी भास्करराव शिंगणे यांच्या पुण्याईच्या भरवश्यावर ,आणी शरद पवार यांच्या निकटवर्त असल्याच्या व प्रबळ विरोधक नसल्याच्या नशिबाच्या जोरावर डॉ राजेंद्र शिंगणे हे मागील बऱ्याच काळापासून सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येत होते,पण सर्ववेळ परिस्थिती सारखी राहत नाही.
आता शरद पवार यांच्या नावाशिवाय निवडणुकीच्या मैदानात ” पानिपत” होण्याची शक्यता दिसल्याने,डॉ शिंगणे साहेब, शरद पवार यांच्यावर कोणीही टीका केली की व्यथित होताना दिसतात पण ते खरंच व्यथित होत आहेत की अस्वस्थ होत आहेत?हा संशोधनाचा विषय आहे असेही पुढे बोलताना गायत्री शिंगणे म्हणाल्या
सिंदखेडराजा व देऊळगाव राजा येथील अनेक प्रतिष्ठित लोक गायत्रीताई शिंगणे यांचे सोबत माननीय पवार साहेबांना भेटायला गेली होती. त्यामध्ये प्रामुख्याने राजेश अंभोरे, राजेश इंगळे, अमोल भट, विजय खान्देभराड, अरुण मोगल, अशोक मोगल, अभय मोगल, रवी मिस्किन, जनार्दन मगर, आरिफ खान,रवी इंगळे, महेश मखमले, संतोष बर्डे, विशाल बंगाळे व इतर जणांचा समावेश होता.