9.1 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

सत्ताकारण! गोष्ट दुसरी.. चिखली विधानसभा मतदारसंघाची… -श्वेताताई महाले,राहुल बोन्द्रे,शंतनू बोन्द्रे,डॉ. ज्योती खेडेकर सह काही नवीन खिलाडी….

चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघ प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या मनमर्जीवर, राष्ट्रीय स्वयं संघाच्या कृपेवर चालत आलेला आहे.तसा भाजपा हा पक्षही येथे मराठा कार्डाच्या भरोशावरच निवडून येत असला, तरी निवडणुकीचे तिकीट मात्र संघाच्या विश्वासू माणसाला दिले जाते .तर चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय घडामोडी सुरू आहेत यातला थोडक्यात आढावा…

सुरेश अप्पा खबुतरे, विजय कोठारी,सुरेश चेके या व इतर भाजपा दिग्गजांना पाठीमागे ठेवून विद्याधर महाले यांनी श्वेता महाले यांच्यासाठी तिकीट खेचून आणले.जातीय समीकरणांचा योग्य आधार घेत सौ श्वेता विद्याधर महाले या निवडूनही आल्या, आगामी निवडणुकीतही चिखली भाजपाचा प्रमुख चेहरा आमदार श्वेता महाले याच राहतील यात काही शंका नाही.परंतु विद्याधर महाले यांचा चिखली विधानसभा मतदारसंघातील आढावा भेटींचा व शिवराज पाटील यांचा युवकावरील प्रभाव पाहता भाजपासाठी महाले कुटुंबीयांमधूनच आणखीन दोन चेहरे तयार आहेत असे म्हणता येईल.

शिवसेना उभाठा या पक्षाला लोकसभा निवडणूक चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले यश मिळाले, ती पाहता प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व कपिल खेडेकर हेच चिखली विधानसभेसाठी उत्सुक असले तर यात काही नवल नाही.

काँग्रेस मधून माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव फिक्स असले तरी योग्य वेळी श्वेता महालेंच्या विरोधात राहुल भाऊ, त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली बोंद्रे यांना उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचेकडून डॉक्टर ज्योती खेडेकर व संजय गाडेकर यांची नावे ग्राह्य धरता येतात पण , त्यांचा मतदारसंघातील वावर खूपच कमी असल्याने त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ शकतो

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून शंतनु बोंद्रे व मनोज दांडगे हे इच्छुक असले तरी दोघांचे उमेदवारी व भविष्य डॉक्टर शिंगणे यांच्या हातात व निर्णयावर अवलंबून राहील.

शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व त्यांना या मतदारसंघात विनायक सरनाईक यांनी दिलेली साथ पाहता विनायक सरनाईक चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून क्रांतिकारी आघाडीमध्ये उभे राहताना दिसते , पण आर्थिक क्षमता या तत्त्वावर विनायक सरनाइक किती टिकतील याबाबत जरा शंका आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये हालचाल करण्याची क्षमता अतिशय कमी असली तरी कैलास भालेकर हे सतत मंत्री महोदय नामदार प्रताप राव जाधव, यांचेसोबत सतत दिसत असल्याने व चिखली शहरातील व्यापारी समुदयाशी त्यांची असलेली जवळीक तसेच, राजकारणात आवश्यक असलेली आर्थिक क्षमता याबाबतीत ते सक्षम असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही तर्क वितर्क लढवले जात आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!