बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड पक्षबांधणीवर भर देत आहे.
आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्रात गावागावांमध्ये शिवसेनेच्या शाखा ओपन होत आहे. २६ जुलै २०२४ रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील ग्राम.हनवतखेड, गोतमारा, कुऱ्हा, कोऱ्हाळा बाजार, खेडी, पान्हेरा, पोखरी, तपोवन, काळेगाव, फर्दापूर, वडगाव खंडोपंत, पुन्हई, अंत्री या गावामध्ये शिवसेना,युवासेना, किसानसेना, अल्पसंख्यांक सेना,महिलाआघाडीच्या शाखा उदघाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आले.यावेळी आ. संजुभाऊ गायकवाड यांच्या धर्मपत्नी मा.नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड,महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.