spot_img
spot_img

सत्ताकारण! गोष्ट पहिली बुलढाण्याची! -प्रस्थापित नेते,इच्छुकांची मांदियाळी, काही नवीन बुडबुडे…

बुलढाणा(हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे) विधानसभेची परीक्षा जवळ येऊन ठेपली आहे.अशा वेळी जिल्ह्यातील सातही मतदारसंघात हालचाली सुरु झाल्या.अशावेळी सर्वकाही आलबेल असल्याच सर्वजण दाखवत असले तरी,खाजवण्याच्या खुणा ‘हॅलो बुलढाणा’ला दिसतात!

बुलढाणा मतदारसंघात आ. संजूभा गायकवाड यांनी अगदी मुर्रब्बी राजकारण खेळताना आपले जुने सहकारी व अद्याप मित्र असलेले जालिंदर बुधवत यांना हाताशी धरून संदीप शेळके यांचा उभाठा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला,आणी आघाडीमध्ये जयश्रीताईला डोकेदुखी निर्माण केली,आता संदीप शेळके आणी जयश्रीताई दोघांनीही जर उमेदवारी मागितली तरीही जनतेत जो संदेश जाईल त्यातून संजूभाऊ गायकवाड पुन्हा आमदार निश्चित होतील,असे वाटत आहे.याला दुसरी बाजू पण आहे.आघाडीमध्ये बिघाडी झाली नाही आणि संदीप शेळके यांनी पक्षादेश मानला व या निवडणुकीपुरता आपल्या महत्वकांक्षांना आवर घातला, तसेच मालती शेळके यांनी संदीप शेळके यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती,तशीच खंबीर साथ जयश्रीताई यांना दिली तर समीकरणे वेगळी असू शकतात.त्याउलट जर जयश्री शेळके यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचे आत्मबलिदान केले तर संदीप शेळके यांचा मार्ग सुकर होईल.बाकी विजयराज शिंदे यांचा लोकरथ सुरूच आहे लोकांना भेटी-गाठी देण्यात काहीतरी शोधात आहे,हे नक्की.तरीही मा.आमदार बंटी सपकाळ यांचेपेक्षा ते जास्त सक्रिय दिसत आहेत.तर भाजपाची ताकद असूनही स्थानिक आमदार महायुतीतील असल्याने,योगेंद्र गोडे यांच्यासारखे लोक सहनही होत नाही आणी बोलताही येत नाही अशा स्थितीत असल्याचे जाणवत आहे.

ध्रुपतराव सावळे यांची नातेवाईक शक्ती आता कित्येक हजारावरून शेकड्यात येऊन पोहचली असल्याने ते जास्त फायदा वा तोटा करतील ही शक्यता कमी आहे.जालिंदर बुधवत तसेही संजय गायकवाड यांच्या विरोधात उभे राहतील ही शक्यता जरी कमी होतीच तरी संदीप शेळकेंना प्रवेश घ्यायला नेऊन त्यांनी आपला वाटा कदाचित संदीप शेळकेना दिला व आपले पूर्वसंबंध कायम ठेवले. त्यामुळे आ.संजूभाऊ विरोधात कोण?या प्रश्नाला फक्त एक उत्तर असेल तर निवडणूक रंजक ठरेलं अन्यथा बुलढाणा शहर व परिसराचा विकास सुरूच राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!