spot_img
spot_img

शहिदांप्रती कृतज्ञता! – कुठे होत आहे शहिदांचा गौरव? -रणगाड्याचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य गाजवत 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली. कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा विजय दिन बुलढाण्यात साजरा होत आहे.

येथील सहकार विद्या मंदिरात हा कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे.
रणगाडे आणि जेट विमानाला नमन करण्यात आले. याप्रसंगी शस्त्रांची प्रदर्शनी देखील भरविण्यात आली आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. शहिदांच्या स्मरणार्थ आमदार संजय गायकवाड, बुलढाणा अर्बन चे संस्थापक राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आमदार धीरज लिंगाडे आदी मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!