बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा,असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने उद्धव ठाकरेंची साथ दिली आहे. मुख्यमंत्री असताना
उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विनाअट विना कागदपत्र थेट
दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. कोरोना काळातील ही त्यांची कामगीरी कौतुकास्पद होती.शिवसेना ही सत्तेसाठी नसून कायम समाजाकरिता कार्यरत आहे.२७ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस
आहे. जिल्ह्यात सर्वांनी आपापल्या तालुक्यात, शहरात,गावात सामाजिक उपक्रम राबवावेत. रुग्णांना फळ टप, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, रक्तदान शिबिर,अन्नदान व अन्य सामाजिक
उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.