10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

देशाला महाशक्ती करणारा लोक कल्याणकारी अर्थसंकल्प! -केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले..

बुलडाणा (हॅलो बुलढाणा)अबकारी शुल्कातुन काही औषधी वगळ्याचा अर्थ संकल्यातील निर्णय आणि शेती क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटीची तरतुदी सह ग्रामीण व शहरी विकासावर भर देत देशाला महाशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा लोक कल्याणकारी अर्थसंकल्प केद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी मांडल्याची प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे …

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थ संकल्पामध्ये सर्व सामान्य नागरीकांचा विचार करून तयार करण्यात आल्याने हा अर्थसंकल्प देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. विशेष म्हणजे रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही औषधांना अबकारी शुल्कातून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे अर्थसंकल्पात या संदर्भाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केली आहे त्यामुळे काही औषधीच्या किमतीही कमी होणार असुन त्याचा फायदा सर्वांना होणार आहे .
मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत करणारा आणि देशाला महाशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे शेती क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरणार आहे युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या 5 वर्षात 20 लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत शहरात राहणाऱ्या 1 कोटी गरीब नागरिकांना 10 लाख कोटी रुपये खर्चून बांधून देण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठारणारा आहे मी या निर्णयाचेही स्वागत करतो असेही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.

▪️पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे मानले आभार

काही औषांधावरील अबकारी शुल्कातुन वगळ्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आला आहे त्यामुळे औषधावरील किमतीत कमी होऊन त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे केंद्रीय आरोग्य व कुंटब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार मानले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!