बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मौजे सुंदरखेड येथील गट नं.65 मधील ओपन स्पेसचा श्वास गुदमरतोय! येथे रस्ता सुद्धा नाही. जीव मुठीत धरून नागरिकांसह चिमुकले विद्यार्थी ही वाट तुडवत आहेत. सदर अतिक्रमण मुक्त करुन येथे रस्ता करून द्यावा अशी मागणी, जिल्हाधिकारी यांना गाडगेनगरवासीयांनी केली आहे.
या त्रस्त नागरिकांनी म्हटले आहे की, मौजे सुंदरखेड येथील गट नं.65/1 मधील क्षेत्र 0.63 आर रे.के.न. एन.ए.पी./ 34 / मधील तसेच गट नं.65/2 सुकाळखेड /26/1992-93 दि. 30/07/1993 मधील क्षेत्र 0.53 आर रे.के.न. एन.ए.पी./34 सुकाळखेड 11/1993-94
दि.14/02/1994 पाडलेल्या दोन्ही ले आउट मधील वाटणीपत्रकानुसार सदर
ले आउटमध्ये एकुण क्षेत्र 1.16 आर असुन शासकीय नियमानुसार सदर ले आउटमध्ये खुला भुखड (Open Space) असणे आवश्यक आहे.
सदर ले आउट अकृषक करीत असताना गट नं.65/1 व गट नं.65/2 दोन्ही ले आउट एन ए ऑर्डर नुसार खुला भुखंड असल्याचे कळते.
परंतु आजरोजी गट नं.65/1 मधील प्लॉट नं. 22 मध्ये खुल्या भुखंडावर निवासी बांधकाम केलेले आहे.
नकाशानुसार गट नं.65/1 सदर ले आउटचे अवलोकन केले असता ले आउट मधील वाटणीपत्रकामध्ये एन ए ऑर्डर नुसार सदर प्लॉट हा 800 चौमी दाखविण्यात आलेला आहे. परंतु प्लॉट नं. 22 चे क्षेत्र कमी दिसुन येते. सदर दोन्ही ले आउट नुसार गट नं. 65/1
प्लॉट नं. 22 हा खुला भुखंड असल्याचे दिसते तरी तत्कालीन अकृषक
धारकांनी व तहसीलदार यांनी संगनमत करुन 800 चौमी खुला भुखंड हा निवासी प्लॉट मध्ये परीवर्तीत केलेला दिसतो. दोन्ही ले आउटमध्ये प्लॉट
मध्ये करीत असतांना 165 चौमी पेक्षा जास्त कोणताही प्लॉट नसतांना
प्लॉट नं. 22 हा 800 चौमी कसा होऊ शकतो याचा अर्थ सदर प्लॉट
217726 नं. 22 हा खुला भुखंडामधुन निवासी भूखंडामध्ये बदल केल्याचे दिसुन
येते. त्यामुळे दोन्ही ले आउटनुसार सामाजीक कार्यक्रमासाठी अडचणी येतात तरी सदर प्लॉट नं. 22 मधील निवासी करू न देण्यात यावा, अन्यथा न्यायमार्गाने प्लॉटचे फेरफार रदद करण्यासाठी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे