बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विकृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.अशाच एका विकृताची प्रचीती एका गावातील पती-पत्नीला आली. या विकृताने चोरुन एका दांम्पत्याचा रात्रीचा व्हीडीओ शूट केला. नव्हेतर याची गावभर चर्चा देखील केली. त्याच्या या कृत्यामुळे प्रचंड मानसिक तणावात सापडलेल्या या दांम्पत्याने पोलीस स्टेशन गाठून या संदर्भात फिर्याद दाखल केली. आरोविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे.
एका गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहे. चार-पाच दिवसांपूर्वी दिवसभर शेतीत
काम करुन थकुन भागुन घरी परतलेल्या आलेल्या या दांम्पत्याने सोबत जेवनावळी केली आणि आपल्या रुमध्ये झोपण्यासाठी
निघुन गेले. मध्यरात्रीनंतर या दांम्पत्याच्या घराभोवती दबा धरुन बसलेल्या एका विकृत मनोवृत्तीच्या भामट्याने अचूक त्याच्या घराची खींड हेरली.नव्हेतर त्याच्याजवळ असलेल्या मोबाइलमध्ये या पती-पत्नीचा रात्रीचा व्हीडीओ शूट केला.एवढ्यावरच न थांबता दोस्ता-
मित्रांना दाखवत सुटला. ही बाब लक्षात आल्यानंतर १८ जुलै रोजी ‘त्या’ दांम्पत्याने धाड पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातल्याची चर्चा आहे.या संदर्भात धाड पोलिसांसोबत संपर्क साधला असता,मोबाइल तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता व आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.