मेहकर (हॅलो बुलढाणा) जम्मू कश्मीर मधील डोडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेहकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय व जानेफळ चौक येथे मेहकर शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शहीद जवानांना मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीर गती प्राप्त झालेल्या सर्व वीर जवानांच्या समर्थनार्थ रास्ता रोको करून दहशतवादी हल्ले रोखण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या निष्ठुर धोरणांविरुद्ध घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रा.आशिष रहाटे. उपजिल्हाप्रमुख,निंबाजी पांडव तालुकाप्रमुख. किशोर भाऊ गारोळे शहर प्रमुख, ॲड. आकाश घोडे युवासेना तालुकाप्रमुख,ऋषिकेश जगताप, युवासेना शहर प्रमुख,ॲड.संदीप गवई. रमेश देशमुख आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.