बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जम्मू कश्मीर मधील दोडा जिल्ह्यात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ उबाठा गट शिवसेनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान आंदोलकांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. आंदोलक म्हणाले की, केंद्र सरकार केवळ योजनांचा पाऊस पडत आहे. देशाच्या संरक्षणासाठी काही करत नाहीत. शेतकरी देशोधडीला लागला आहे. मात्र केंद्र सरकारला काही सोयरसुतक नसल्याचा धिक्कार यावेळी करण्यात आला. यावेळी काळे झेंडे दाखवून, अतिरेकी हल्ल्यावर लगाम घालावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने देण्यात आला आहे.या आंदोलनात तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, आशिषबाबा खरात, ओम नाटेकर आदींनी सहभाग घेतला होता.