spot_img
spot_img

अरे हे काय? अदिती अर्बन बँकेचे संस्थापक सुरेश देवकर यांच्या नावे फेक अकाउंट !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बँकिंग क्षेत्रासह सामाजिक, राजकीय क्षेत्रात चर्चेत असणारे अदिती अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश देवकर यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या फेसबुकवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नये,असे आवाहन करण्यात आले आहे.

अदिती अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर यांचे सर्व क्षेत्रात मोठे वलय आहे. परंतु
सध्या सायबर गुन्हेगार नवनवीन मार्ग अवलंबवून फसवेगिरी करतात.सध्या सायबर गुन्हेगार फेक अकाउंट बनवून ऑनलाईन फ्रॉड करण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगार फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट बनवून ऑनलाईन फसवणूक करत आहे. दरम्यान श्री देवकर यांचे नावेसुद्धा फेसबुकवर फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!