बुलढाणा (हॅलो बुलढाणा)‘साद घालणं सोप्पं असतं, साथ देणं कठीण…वाद घालणं सोप्पं असतं,संवाद साधणं कठीण…हात धरणं सोप्पं असतं,धरून ठेवणं कठीण..’तसा तर हा सुविचार आहे. पण या सुविचाराची लोकप्रतिनिधींनी आवर्जून दाखल घ्यावी.. कारण मेहकर तालुक्यातील तब्बल साडेचार हजार शेतकरी पिक विमाच्या रकमेपासून पासून वंचित आहेत.नरेंद्र मोदींची पिक विमा योजना फसवी फसवी आहे, असा उघड आरोप होत आहे.रब्बी हंगामाचा पिक विमा मिळालाच नाही, आता खरीप योजनांची तारीख वाढविल्याचे कृषी विभाग सांगत आहे.
रब्बी हंगामातील पिक विम्याची रक्कम अजून साडेचार हजार शेतकऱ्यांना मिळाली नाही. आणि आता पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा एक मोठा धोका आहे.शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2023 मधील पीक विमा रक्कम तत्काळ जमा करणे बाबत जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले आहे. मौजे सावत्रा व सोनार गव्हाण
मधील शेतकरी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2023 मध्ये हरभरा पिकाचा विमा उतरवला होता.माहे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे हरभरा पिकाचे आतोनात नुकसान झालेले होते.कंपनीच्या नियमांप्रमाणे 72 तासांच्या आत पीक नुकसानीची तक्रार एप्लिकेशन, फोन, ईमेल द्वारे केलेली होती. या तक्रारीची दखल घेऊन कंपनीचे प्रतिनिधी यांनी
संबंधित शेतात येऊन पीक नुकसानीचा पंचनामा केलेला आहे.
खरीप हंगाम सुरू झालेला असून, रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी केवळ भूलथापा देत असून, शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे.