spot_img
spot_img

BREAKING! मुंढे साहेबानं ‘त्या’ आजीचं ऐकलं अन् काजूकतली अळी प्रकरणही महाराष्ट्रभर पेटलं! ‘हॅलो बुलढाणा’ च्या दोन्ही बातम्यांचा इम्पॅक्ट..तुकाराम मुंढे बुलढाणा जिल्ह्यात येणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भेसळखोरीची चिड आलेल्या खामगावातील एका आजीने तुकाराम मुंडे साहेबांना ‘बुलढाणा जिल्ह्यात या.. येथे अधिकारी पैसे खाऊन रायले’ अशा बिनधास्त अंदाजाच्या व्हिडिओतील आमंत्रणाचे वृत्त सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने प्रसारित केले होते.शिवाय ‘हॅलो बुलढाणा’चे ‘काजूकतली अळी प्रकरण’ महाराष्ट्रभर पेटल्याने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे लवकरच बुलढाण्यात धडकणार असल्याची पक्की खबर आहे. ते कधी येणार? हे माहिती नाहीये,पण थेट कारवाईच्या तलवारीला धार लावूनच येणार एवढे मात्र निश्चित आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवलेले अन्न व औषधी प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे हे गरीब व सामान्यांसाठी पारदर्शीपणे काम करतात. त्यांच्या भेसळखोरी विरुद्धच्या धडाकेबाज कायदेशीर कारवाईमुळे ते आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेत. दरम्यान ‘तुकाराम मुंडे साहेब..जरा बुलढाणा जिल्ह्यात या! खामगावात तेलात भेसळ, फळात भेसळ सारी भेसळ सुरू हाय..मोठा भ्रष्टाचार सुरू हाय.. सारे अधिकारी पैसे खाऊन रायले!’ असे व्हिडिओच्या माध्यमातून खामगावातील एका आजीने आरोप केल्याची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ ने उचलून धरली. बातमीचा बुलंद आवाज तुकाराम मुंढे यांच्या कानापर्यंत पोहोचल्याने आता ते बुलढाणा जिल्ह्यात येण्याच्या तयारीत आहेत. शिवाय बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉल मधून खरेदी करण्यात आलेल्या ‘सीताश्री- लक्ष्मीनारायण’ कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये चक्क बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या होत्या. तक्रारीवरून येथील अन्न व औषधी प्रशासनाने दखल घेत अन्नसुरक्षा अधिकारी जीके वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक देत कारवाई केली. ‘हॅलो बुलढाणा’ने काजूकतली मध्ये अळ्या निघाल्याच्या प्रकरणाचा धुराळा उडविल्याने हे प्रकरण महाराष्ट्रभर पेटले.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. या ‘हॅलो बुलढाण्या’ च्या इम्पॅक्टमुळे आता तुकाराम मुंढे जिल्ह्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ते कधी? केव्हा? येतील हे सांगता येत नाही. मात्र ते भेसळखोरांचा बँड नक्कीच वाजवणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!