बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पक्षांकडून होणारे सर्व्हे महत्वाचे आहेत. पक्षाने सांगितले तरच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे अन्यथा आपले काम करायचे.. असे वरिष्ठांकडून सांगितले जाते. परंतु आम्ही सतरंज्याच उचलायला आहोत का? असा प्रश्न निवडणुकीसाठी इच्छुकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अनेक विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांसह प्रा. सदानंद माळी यांनी सुद्धा विधानसभेच्या मैदानात उडी घेण्याचे ठरविले आहे. त्यांनी मीच प्रबळ उमेदवार असल्याचा दावा देखील केला आहे.
तीन लाख मतदान संख्या असलेल्या बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीला शह देण्यासाठी अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उबाठाचा उमेदवार पराभूत झाला होता,आणी आता विधानसभेच्या निवडणुका काही काळातच होऊ घातल्या आहेत.त्यासाठी महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार तयार झाले आहेत. महायुतीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी महाविकास आघाडीने एकाच उमेदवारला या निवडणुकीत उतरविले पाहिजे,त्यासाठी उच्चंशिक्षित अनुभवी जनतेच्या सुखदुःखात उभा राहणारा म्हणून दोन ते तीन भावी उमेदवारचे नावे पुढे आले असल्याची माहिती हाती सूत्रांनी दिली आहे. त्यात प्रा. सदानंद माळी यांचे सुद्धा नाव आहे.मात्र उमेदवारी कोणाला द्यायची ते महाविकास आघाडी ठरविणार आहे. तसेच मधल्या काळात खा. अरविंद सावंत बुलढाण्यात येऊन गेले त्यावेळी उबाठा चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बुलढाणा विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे भावना व्यक्त केली होती. त्यामुळे तेही चर्चेत आहेतच..पण जनतेचा कौल कोणाकडे राहील हे येणारा काळच ठरवेल, असा सूर उमटत आहे.