बुलढाणा (हॅलो बुलढाणा/लखन जाधव) कष्टकऱ्यांचे प्रश्न घेवून आज ११ जुलै रोजी रविकांत तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील औसा येथे मशाल मोर्चा काढला.
अद्यापही राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही, सोयाबीन-कापसाला भाव नाही,मजूरांना विमा सुरक्षा कवच नाही, तसेच निराधारांना अतिशय अत्यल्प मानधन मिळत आहे, वन्य प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे, यामुळे शेतकरी, शेतमजूर, निराधारांची अवस्था बिकट आहे. मात्र सरकार याबाबतीत गंभीर नसून अतिशय असंवेदनशीलपणे या सर्व प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे. म्हणूनच सरकारला जागे करण्यासाठी हा मशाल मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासनाने तातडीने शेतकरी, शेतमजूर व निराधारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावे, अन्यथा या विषयाला घेवून राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहोत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राजेंद्र मोरे, राजू कसबे, सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, सिद्धाजी जगताप, नवनाथ शिंदे, लक्ष्मण मोरे, नितीन पाटील, रुपेश शिंके, अरुण पाटील, हिराचंद जैन, दगडू बर्डे, श्रीराम चलवाड, सुमनताई कांबळे, सुरेखाताई हिवाळे, मोहीनीताई कांबळे, मीनाक्षी डोंगरे, शांताबाई राठोड नागनाथ सातपुते, भरत पाटील, रवी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.