spot_img
spot_img

सरकार शेतकऱ्यांचा किती बळी घेणार? -रोहिणखेडच्या शेतकऱ्याने घेतला गळफास

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवसागणिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनेत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना सरकार केवळ गाजर दाखविते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत ढकलल्या जात आहे. 9 जुलैला रोहिणखेड येथील शेतकरी संतोष लक्ष्‍मण राजनकर वय 42 वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे संतोषला दारूची व्यसन लागले होते. वैतागलेल्या संतोषने अखेर घरातील लोखंडी पाईपला गळपास घेऊन जीवन यात्रा संपविली. संतोषला जेवणासाठी बोलविण्यास त्यांची आई गेली असता हे दुर्दैवी दृश्य समोर आले. धामणगाव बढे पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!