बुलढाणा (हॅलो बुलढाणा)बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारी इमारतीसाठी पुन्हा एकदा कोट्यावधीचा निधी खेचून आणला. आमदार गायकवाड यांच्या मागणीनुसार बुलढाणा विधानसभेला 25 कोटी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत विकासाचा झंझावात उभा केला आहे. आज विधानसभा अंतर्गत विविध ठिकाणी शासकीय इमारती निर्माण करण्यासाठी 25 कोटी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज अर्थसंकल्पात सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मोताळा तालुक्यात एकूण 28 तलाठी कार्यालयाचे बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख रुपये, बुलढाणा तालुक्यात 13 तलाठी कार्यालयासाठी 1 कोटी 95 लाख,
जिल्हा प्रयोगशाळेच्या
बांधकामासाठी 2 कोटी 5 लाख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे जुने रुग्णालय प्रवेशद्वार व मैदान बळकटीकरिता 40 लाख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे क्षयरोग रुग्णालयाच्या वसीगृहाचे बळकटीकरण करण्यासाठी 99 लाख, तसेच येथील निवासस्थानाकरिता 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव देवी, महाळुंगी, धामणगाव बडे, ब्राह्मदा, कुराळा, खडकी, खामखेड, आदी ठिकाणे प्रजिमा 113 किमी 16/600 ते 400 ची सुधारणा साठी 5 कोटी रुपये, मलकापूर- बुलढाणा- चिखली रस्ता जुना प्ररामा 13 रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक लावणे आणि नालीचे बांधकाम करणे यासाठी 6 कोटी रुपये, रुंदीकरणासह सुधारणा करणे चे काम केले जाणार आहे.
मोतला तालुक्यातील धामणगाव बढे, रिधोरा खुर्द,पोफळी, गवळी, कोली गवळी, आव्हा, युनुसपूर, दहिगाव रस्ता प्रजिमा 99 किमी 15/700 ते 18/00
ची सुधारणा साठी 4 कोटी रुपये असे एकूण 25 कोटी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.