spot_img
spot_img

अयोध्येत बुलढाणा अर्बनची ‘सरयू महाआरती’ गाजली; आता दररोज आरतीचा मोठा निर्णय!

अयोध्या (हॅलो बुलडाणा) दि. 11 एप्रिल 2026 बुलढाणा अर्बन परिवाराने सरयू नदीच्या नया घाटावर आयोजित केलेली भव्य महाआरती संपूर्ण अयोध्येत चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल 150 जणांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आरतीत कर्मचारी व संचालक मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. स्थानिक चॅनलवर ही आरती प्रचंड व्हायरल झाल्यानंतर घाटावरील व्यापारी व ट्रस्टींमध्ये आनंद निर्माण झाला

या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली आणि सरयू नदीवर दररोज महाआरती घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे धार्मिक वातावरण अधिक बळकट होणार असून अयोध्येत भक्तीचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

महासचिव शशिकांत दास यांनी स्वतः भेट घेऊन आरतीचे कौतुक केले आणि सरयू उत्सव ट्रस्टच्या माध्यमातून नियमित आरती सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. बुलढाणा अर्बन परिवारासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात असून “जय श्रीराम” च्या घोषणांनी अयोध्या दुमदुमली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!