ज.जामोद (हॅलो बुलडाणा /ज्ञानदेव राजनकर) थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती जळगाव जामोद तालुक्यात उत्साहाच्या शिखरावर साजरी झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. शहरातून निघालेल्या मोटरसायकल रॅलीने वातावरण दणाणून सोडले, तर संध्याकाळी भव्य मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली.
तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्यांच्या माध्यमातून फुले विचारांचा जागर केला गेला. ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथांच्या वाचनातून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपले. विविध संस्थांकडून गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप व मोफत आरोग्य शिबिरांनी कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.
१८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा क्रांतिकारी पाया रचणाऱ्या फुलेंचा “विद्येविना मती गेली” हा विचार आजही तितकाच ज्वलंत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.यावेळी माजी आमदार कृष्णाराव इंगळे, सौ. अपर्णाताई संजय कुटे, प्रसन्नजीत पाटील, डॉ. स्वातीताई वाकेकर, गणेश दांडगे, डॉ.सतीश शिरेकर, प्रा. भाऊसाहेब इंगळे,गजानन वाघ, दत्तात्रय पाटील,सचिन देशमुख, कैलास पाटील,सौ.लताताई तायडे, अविनाश उमरकर, गजानन सरोदे,प्रवीण भोपळे, ग.दी.वानखडे, निलेश शर्मा, डॉ.संदीप वाकेकर,ना.श.कांडलकर, तुकाराम काळपांडे, एड. रतन इंगळे, प्रभाकर बंड, प्रकाशशेठ ढोकणे, अजय वंडाळे, मनोज राठी,सारंगधर गोमासे, एड.संदीप मानकर, परीक्षित ठाकरे, डॉ.बगाडे, राजु कपले, सुनील रघुवंशी, प्रल्हाद खीरोडकर, समाधान बगाडे,रमेश ताडे, अनिल हेलोडे, इरफान भाऊ यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार नितीन कुमार पाटील, नारायण सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.











