जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) जामोद येथील शिवापूर भागातील रहीवाशी रमेश नामदेव निंबाळकर वय ५५ वर्ष या शेतकऱ्याला शेतात अचानक विषारी सापाने दंश केल्याने या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमेश नामदेव निंबाळकर हे दिनांक ७ एप्रिल रोजी ईसाई (खेल लोण )शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात गव्हाचा गवंडा पेठवण्याकरता गेले होते गवंडा पेठवल्यानंतर सकाळी ११ वाजता शेतात विश्राम करत असतांना अचानक त्यांना विषारी सपाने दंश केल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतू शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खामगांव येथे नेत असतांना वाटेतच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यु झाला सदर शवविच्छेदनानंतर शेतकऱ्यावर दिनांक ८ एप्रिल रोजी जामोद येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणाऱ्यात आले वरील घडलेल्या दुदैवी घटनेमुळे जामोद परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते असून मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी ,४ मुले ३ सुना, व नातवंडे असा आप्त परिवार आहे.











